‘सैरा’मध्ये असा असेल तमन्नाचा लूक


लवकरच ‘सैरा नरसिंह रेड्डी’ या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया झळकणार आहे. महानायक अमिताभ बच्चन, चिरंजीवी यांच्यासोबत तगडी स्टारकास्ट एतिहासिक विषय असलेल्या या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा दमदार ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता. त्याचबरोबर या चित्रपटातील कलाकारांचे लूकही समोर आले होते. आता तमन्नाने तिची भूमिका असलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

बऱ्याच दिवसांपासून ‘सैरा नरसिंह रेड्डी’ हा चित्रपट चर्चेत आहे. चाहत्यांना चिरंजीवी आणि अमिताभ बच्चन या दोघांनाही एकत्र पाहण्यासाठी या चित्रपटाची आतुरता आहे. हा एक पिरिअड ड्रामा आहे. या चित्रपटाची १८८० च्या काळातील आंध्र प्रदेशातील एका लढाऊ योद्ध्याची ही कथा आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटीशांविरुध्द एल्गार पुकारणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकाची ही सत्यकथा आहे.

View this post on Instagram

Here's a glimpse of #Lakshmi

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks) on


या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेंद्र रेड्डी यांनी केले असून या चित्रपटाचा राम चरण निर्माता आहे. गेली ३ वर्षे या चित्रपटाचे शूटींग सुरू होते. हा एक बिग बजेट चित्रपट आहे. यातील फाईटच्या एका सीनसाठी तब्बल ४५ कोटी रुपये खर्च झाला आहे. यावरुन चित्रपटासाठी किती मेहनत घेतली गेली आहे याचा अंदाज येऊ शकतो.

लक्ष्मी हे पात्र या चित्रपटात साकारताना तमन्ना दिसणार आहे. २७० कोटींच्या आसपास या चित्रपटाचे बजेट आहे. यामध्ये भरपूर स्पेशल इफेक्ट्स, तंत्रज्ञान आणि व्हिएफएक्सचा वापर करण्यात आला असल्यामुळे या चित्रपटात भव्यदिव्यता पाहता येणार आहे. सुपरस्टार चिरंजीवी, के. सुदिप, विजय सेतुपती, जगपतीबाबू, नयनतारा, तमन्ना आणि अनुष्का शेट्टी यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. अमिताभ बच्चन यांची यात विशेष भूमिका असेल. २ ऑक्टोबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Leave a Comment