युएनच्या हवामान बदल परिषदेत सहभागी होणार मोदी

अमेरिका दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हाउडी ‘मोदी’ कार्यक्रमानंतर संयुक्त राष्ट्र महासभेच्या 74 व्या परिषदेसाठी न्युयॉर्कला रवाना झाले. मोदी आज हवामान बदलावर बोलणार आहेत. याचबरोबर ते लीडर्स डॉयलॉगमध्ये दहशतवादावर देखील संबोधित करतील. पंतप्रधान मोदी दुसऱ्यांदा महासभेला संबोधित करणार असून. याआधी डिसेंबर 2014 मध्ये ते महासभेच्या बैठकीत सहभागी झाले होते.

संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांच्याबरोबरच अन्य प्रतिनिधी मंडळांसोबत द्विपक्षीय बैठक घेतली. त्यानंतर ते न्युयॉर्कमध्ये भारतीय समुदायाला देखील संबोधित करणार आहेत.

पंतप्रधान मोदी नूतनीकरणक्षम उर्जेचा वापर आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी 24 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रात 50 किलोवॉटच्या गांधी सोलर पार्कचे उद्धघाटन देखील करतील. भारताने सोलर पॅनल आणि ग्रीन रूफ प्रोजेक्टसाठी 10 लाख डॉलर दिले आहेत. त्याच्या अंतर्गत युएन मुख्यालयाच्या छतावर सोल पॅनल लावण्यात आले आहेत. 27 सप्टेंबरला मोदी महासभेला संबोधित करतील.

भारत आणि स्वीडन युएन हवामान बदल परिषदेत उद्योगांद्वारे होणारे कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी सुरू करण्यात येणाऱ्या योजनेचे नेतृत्व करतील. पॅरिस करार लागू करण्याबरोबरच 9 परस्परावलंबी क्षेत्रांवरही लक्ष्य केंद्रीत करण्यात येईल. 19 देश याचे नेतृत्व करतील व आंतरराष्ट्रीय संघटना यामध्ये मदत करेल.

न्युयॉर्कला रवाना होण्याआधी मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमात 50 हजारांपेक्षा अधिक भारतीय समुदायाला संबोधित केले.

 

Leave a Comment