या व्हिडीओमुळे आनंद महिंद्रांना अश्रू अनावर

उद्योगपती आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. त्यांनी नुकताच शेअर केलेल्या व्हिडीओने अनेक जणांना भावूक केले आहे. स्वतः आनंद महिंद्रा हे देखील हा व्हिडीओ पाहून स्वतःचे अश्रू रोखू शकले नाहीत.

आनंद महिंद्रा यांनी वॅसिलिना क्नुत्झेन, या 2 वर्षांच्या रशियन मुलीचा व्हिडीओ शेअर केला आहे. ही 2 वर्षांची चिमुकली दिव्यांग आहे. जन्मताच या मुलीला हात नाहीत. व्हिडीओमध्ये दिसते की, ही चिमुकली पायामध्ये चमचा पकडून जेवत आहे.

आनंद महिंद्रा यांनी व्हिडीओ शेअर करत लिहिले की, नुकतेच मी माझ्या नातवाला भेटलो. त्यानंतर जेव्हा मी ही व्हॉट्सअॅप पोस्ट बघितली तेव्हा मी स्वतःचे अश्रू रोखू शकलो नाही. आयुष्यात ज्या काही समस्या किंवा आव्हाने आहेत, ती एक भेटवस्तूच आहे. त्याचा कसा वापर करायचा ते आपल्यावर निर्भर आहे. या सारखे फोटो मला आशावादी ठेवण्यास मदत करतात.

महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर केल्यापासून हजारो कमेंट्स आल्या आहेत.  50 हजारांपेक्षा अधिक लाइक्स आणि 10 हजारांपेक्षा अधिक रिट्विट्स देखील आले आहेत.

अनेक युजर्स या चिमकुलीच्या प्रयत्नांचे प्रशंसा करत आहेत.

Leave a Comment