अंकुश चौधरीच्या ‘ट्रिपल सीट’चा टीझर रिलीज


संकेत पावसे दिग्दर्शित ‘ट्रिपल सीट’ या आगामी मराठी चित्रपटात आयुष्यात दिलेली वेळ आणि दिलेला शब्द पाळण्यासाठी काही लोक फार तत्पर असतात. त्यांच्या मते, आयुष्याचा प्रवास हा यातूनच पुढे जात असतो, अशाच कृष्णा सुर्वेची हटके मनोरंजक कथा बघायला मिळणार असल्याचे या चित्रपटाच्या टीझर वरून लक्षात येते. प्रेक्षकांसाठी यंदाच्या दिवाळीत मेजवानी ठरणाऱ्या ‘ट्रिपल सीट’चा टीझर नुकताच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे.

अभिनेता अंकुश चौधरी हा अनुष्का मोशन पिक्चर्स आणि एंटरटेनमेंट, अहमदनगर फिल्म कंपनी निर्मित ‘ट्रिपल सीट’ या चित्रपटाच्या टीझरमध्ये हात जोडत मी कृष्णा सुर्वे अशी स्वतःची ओळख करून देत, आपण आयुष्याच्या प्रवासातील एक प्रवासी असून आपली स्टेअरिंग वरच्याच्या हातात असल्याचे सांगतो. त्याचबरोबर हे सांगताना तो चोरून कुणाच्या तरी घरात शिरून काही तरी शोधत असल्याचे दिसते. तसेच कृष्णाला एका अंधाऱ्या खोलीत बसलेली एक तरुणी कॉल करून मदत करण्याची विनंती करते. नेमकी ही तरुणी कोण आहे? आणि कृष्णा तिची मदत करणार का? याविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

चित्रपटाच्या टीझरमध्ये नुकतीच मराठी बिगबॉस मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी सुर्वे पावसाच्या प्रत्येक थेंबाला स्वतःच एक गाणे असते असे सांगत, ते ऐकत पावसात चिंब भिजताना आपल्या दिसते. तसेच अंकुश बरोबर गप्पा मारताना ती खळखळून हसताना दिसते. तर त्याचवेळी अभिनेत्री पल्लवी पाटील अंकुशाचा हात पकडताना दिसते यामुळे ‘ट्रिपल सीट’ मध्ये नक्की काय ट्विस्ट आहे हे जाणून घेण्याची उत्कंठा वाढली आहे. अंकुश चौधरी, शिवानी सुर्वे, पल्लवी पाटील यांच्यासह चित्रपटात प्रविण विठ्ठल तरडे, राकेश बेदी यांच्या भूमिका आहेत. यंदाच्या दिवाळीत २४ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment