
आपल्या अंतर्गत प्रश्नांपेक्षा काश्मीरचा प्रश्न पाकिस्तानला खूपच महत्त्वाचा वाटतो. पाकिस्तानमधील एका टिव्ही चॅनेलवर जम्मू काश्मीर आणि कलम 370 वर चर्चा आयोजित करण्यात आली होती. लाइव्ह टेलिकास्टही या शोचे सुरू होते. यादरम्यान एका पाकिस्तानी विश्लेषकाने आपले मत व्यक्त करण्यास सुरुवात केली आणि त्याचवेळी तो आपल्या खुर्चीवरून खाली पडले. शोचा अँकरदेखील यादरम्यान त्यांच्याकडे पाहतच राहिला. त्यातच हा प्रोग्राम लाइव्ह सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात याचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला.
काश्मीरप्रश्नी चर्चेदरम्यान बोलताना तुटली पाकिस्तानी तज्ज्ञाची खुर्ची
During a live discussion on Kashmir an analyst falls off his chair. This happened on Pakistan's GTV. pic.twitter.com/gWGcBoboVi
— Naila Inayat नायला इनायत (@nailainayat) September 17, 2019
अनेकांनी हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याची खिल्ली उडवण्यास सुरूवात केली. कोणी त्यांना टप्प्याटप्प्याने पडत आहात का असे विचारले तर कोणी ती खुर्ची चायना मेड होती का असा सवाल केला आहे. हे असे काही पहिल्यांदाच घडलेले नाही जेव्हा पाकिस्तानमधील कोणत्या लाइव्ह शोचा व्हिडिओ असा व्हायरल झाला.
सोशल मीडियावर पंतप्रधान इम्रान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ या पक्षाच्या बैठकीचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला होता. फेसबुकवरून त्यांच्या पक्षाच्या बैठकीचे लाइव्ह स्ट्रिमिंग करण्यात येत होते. याचदरम्यान एका मंत्र्याच्या डोक्यावर कॅट फिल्टर लागल्याचे पहायला मिळाले होते.
