ओठांवर करविलेल्या सर्जरीमुळे या अभिनेत्री सातत्याने चर्चेत

actress
सुंदर दिसण्याकरिता प्लास्टिक सर्जरी करविणे हा सिनेसृष्टीतील अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. प्लास्टिक सर्जरीच्या मार्फत आपल्या शरीरामध्ये आणि मुख्यत्वे चेहऱ्यामध्ये हवे तसे बदल करविणे ही सामान्य बाब झाली आहे. प्लास्टिक सर्जरी करविण्याची पद्धत फार पूर्वीपासून हॉलीवूड आणि गेल्या काही दशकांपासून बॉलीवूडमध्ये ही रुजली असली, तरी त्याबद्दल मोकळेपणाने चर्चा केली जात नसे. पण बदलत्या काळासोबत ही रीतही बदलली असून, आता आपण करविलेल्या प्लास्टिक सर्जरीबद्द्ल हे सितारे मनमोकळेपणाने चर्चा करीत असताना दिसत आहेत.
actress1
‘बिग बॉस’ या लोकप्रिय टीव्ही रियालिटी शोमध्ये झळकलेली छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सारा खान तिने ओठांवर करविलेल्या प्लास्टिक सर्जरीमुळे चर्चेत आली आहे. तिच्या या नव्या लुकबद्दल अनेक प्रतिक्रिया सोशल मिडीयावर पहावयास मिळत आहेत. अनेकांनी तिच्या या नव्या लुकचे कौतुक केले असून, यासाठी अनेकांनी तिला ट्रोलही केले आहे. पण चाहत्यांच्या नकारात्मक प्रतिक्रियांनी खचून न जाता आपल्याला हवे ते करण्याची सवय आपल्याला झाली असल्याचे सारा म्हणते.
actress2
सारा प्रमाणेच अभिनेत्री आयेशा टाकिया, मौनी रॉय, वाणी कपूर आणि प्रियांका चोप्रा यांनी ही त्यांच्या ओठांवर प्लास्टिक सर्जरी करवून घेतली आहे. आयेशा टाकियाने तिच्या ओठांवर करवून घेतलेल्या प्लास्टिक सर्जरीमुळे तिचा चेहरा इतका वेगळा दिसू लागला, की अनेकांनी तिला ओळखलेच नसल्याचे म्हटले आहे.
actress3
मागील वर्षी अक्षय कुमार बरोबर ‘गोल्ड’ चित्रपटामध्ये झळकलेली मौनी रॉय हिनेही आपल्या ओठांवर प्लास्टिक सर्जरी करविली आहे. अभिनेत्री वाणी कपूर हिने ओठांवर प्लास्टिक सर्जरी करवून घेतली असून, ही सर्जरी फसली असल्याचे वाणीचे म्हणणे आहे. तर प्रियांका चोप्राने अनेक वर्षांपूर्वी ओठांवर प्लास्टिक सर्जरी करविल्यानंतर ती अधिकच सुंदर दिसू लागली असल्याचे तिच्या चाहत्यांचे मत आहे.

Leave a Comment