संतुलित आहार आणि योग्य व्यायामाने वजन घटत नसल्यास या गोष्टी विचारात घ्या

weight
वजन घटविणे सहज साध्य होणारी गोष्ट नसून यासाठी शिस्तबद्ध जीवनशैलीची आवश्यकता असते. दृढ निश्चय, मनावर ताबा आणि मेहनत करण्याची तयारी या गोष्टी देखील वजन घटविण्याच्या ध्येयासाठी आवश्यक आहेत. यासाठी संतुलित आहार आणि नियमित व्यायाम या दोन मुख्य आवश्यकता आहेत. व्यायाम आणि आहाराचे संतुलन साधल्याने वजन घटण्यास सुरुवात होते खरी, पण त्यामध्ये मनाजोगी प्रगती दिसून येत नाही. अश्या वेळी वजन घटविण्यासाठी संतुलित आहार आणि पुरेसा व्यायाम यांना आणखी कशाची जोड दिली जाऊ शकते याचा विचार केले जाणे आवश्यक ठरते.
weight1
वजन न घटण्यामागे, आपल्या आहारातील प्रथिनांचा आभाव हे महत्वाचे कारण असू शकते. आहारामध्ये प्रथिनांचे योग्य प्रमाण वजन घटण्यास सहायक असते. प्रथिनांचे योग्य मात्रेमध्ये सेवन शरीराची चयापचय शक्ती वाढविण्यास सहायक असून, प्रथिनांच्या सेवनामुळे भूक लवकर शमते, आणि म्हणूनच वारंवार काही तरी खाण्याची भावना होत नाही. प्रथिनांच्या सोबतच आहारामध्ये स्निग्ध पदार्थांचे योग्य प्रमाण असणे ही गरजेचे असते. सर्वच फॅटस् शरीरासाठी अपायकारक नाहीत. मोनोसॅच्युरेटेड फॅटस् शरीरासाठी चांगले असून, वजन घटविण्यास सहायक आहेत.
weight2
वजन नियंत्रित ठेवण्यासाठी पाणी योग्य प्रमाणामध्ये प्यायले जाणे ही आवश्यक असते. पाण्यामध्ये क्षार असून, हे आपल्या शरीराला वजन घटविण्यासाठी आवश्यक आहेत. त्याचबरोबर व्यायामानंतर आहार किती घेतला जातो याकडे ही लक्ष दिले जाणे आवश्यक आहे. व्यायामानंतर भूक लागणे साहाजिक आहे. मात्र याच वेळी आहार अतिशय पौष्टिक पण मर्यादित असणे आवश्यक असते. व्यायाम केल्यानंतरचा आहार हा खूप जास्त प्रमाणात घ्यायचा नसून, तो पचण्यास हलका, आणि पौष्टिक असावा. खाद्य पदार्थांच्या जोडीने आपण सेवन करीत असलेल्या पेयांमधून आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त कॅलरीज तर जात नाहीत, याचीही काळजी घेणे आवश्यक आहे.

Leave a Comment