‘ही’ लक्षणे आढळल्यास गर्भवती महिलांनी त्वरित घ्यावा डॉक्टरांचा सल्ला

pregnant
महिला गर्भवती असताना तिच्या शरीरामध्ये अनेक लहानमोठे बदल नित्यनेमाने घडून येत असतात. त्यामुळे कधी अचानक जाणविणारा एखादा बदल किंवा एखादे लक्षण या अवस्थेमध्ये सामान्य आहे किंवा नाही याबाबत क्वचित संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्याचप्रमाणे प्रत्येक महिलेचा तिच्या गर्भावस्थेतील अनुभव निराळा असल्याने उद्भविलेला बदल हा सामान्य आहे किंवा नाही हे सांगणे कठीण होते. त्यामुळे शरीरामध्ये घडून येणाऱ्या प्रत्येक बदलाच्या बाबतीत अनेक प्रश्न गर्भवती महिलेच्या मनामध्ये उद्भविणे साहजिक असले, तरी याबाबतीत काळजी करण्यासारखे कारण बहुधा नसते. मात्र काही लक्षणे अशी असतात, जी उद्भविल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. या लक्षणांच्या बद्दल जाणून घेऊ या.
pregnant1
गर्भवती महिलेला हात-पाय, कंबर किंवा पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. मात्र या वेदना जर सातत्याने जाणवू लागल्या तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तसेच वेदनांच्या सोबत सतत मळमळणे, अचानक रक्तसराव सुरु होणे, डोकेदुखी, दृष्टी धूसर होणे या समस्या उद्भविल्या तर त्या बाबत डॉक्टरांना त्वरित सूचना देणे आवश्यक आहे. पोटामध्ये अचानक दुखू लागणे हे ‘ectopic’ प्रेग्नन्सीचे लक्षण असू शकते व त्यासाठी तातडीच्या वैद्यकीय सल्ल्याची आवश्यकता असते.
pregnant2
गर्भावस्थेच्या पहिल्या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये थोडा जरी रक्तस्राव जाणविला, तर त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. या शिवाय जर तीव्र डोकेदुखी सातत्याने उद्भवत असेल तर हे लक्षण रक्तदाब वाढत असल्याचे असू शकते. त्यामुळे त्याबाबतही वेळेवर तपासणी करून घेणे गरजेचे आहे. गर्भावस्थेमध्ये दृष्टी अंधुक होणे हे ‘जेस्टेशनल डायबेटीस’चे लक्षण असू शकते. दृष्टी अंधुक होण्याबरोबर वेदना, अंगावर सूज, अचानक वजन खूप जास्त वाढू लागणे, इत्यादी लक्षणेही क्वचित दिसून येतात. अशा वेळी तपासणीची आवश्यकता असते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment