पक्ष सोडून जाणाऱ्यांवर टीका करताना शरद पवारांची जीभ घसरली


उस्मानाबाद- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पक्षाला सोडून गेलेल्या नेत्यांवर चांगलेच बरसले. पक्ष सोडून जाणाऱ्यांवर टीका करताना पवारांची जीभ घसरली. तुम्हाला कुठे जायचे आहे तिथे जा आणि झक मारा, असे वक्तव्य पवार यांनी केले आहे.

उस्मानाबाद येथे शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा घेतला. यावेळी पवार म्हणाले, मी एका नेत्याला भेटलो असता त्यांनी कारखान्याच्या चौकशीच्या नोटीस आल्यामुळे साहेब मला जाण्याशिवाय पर्याय नाही, असे तो नेता मला म्हणाला. त्याला मी तुम्ही कुठेही जा आणि झक मारा, असे बोललो. ‘झक मारा’ हे वाक्य वापरताना पवारांनी कोणाचाही नामोल्लेख न केल्यामुळे हा शब्द डॉ. पद्मसिंह पाटील, उदयनराजे किंवा राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांपैकी कोणाला वापराला हा चर्चेचा विषय ठरला.

पवारांनी डॉ. पद्मसिंह पाटील व राणाजगजितसिंह पाटील यांनी पक्ष सोडल्यानंतर प्रथम राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा घेतला व भव्य शक्ती प्रदर्शन करत राणाजगजितसिंह पाटील व डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यावर थेट तोफ डागली. पुढील काळात पाटील व पवार कुटुंबाची लढाई अधिकच तीव्र होईल, असे संकेत दिसून येत आहेत.

Leave a Comment