‘या’ हॉलिवूड चित्रपटातून जगभर उलगडणार झाशीच्या राणीचा इतिहास


आता मराठी रुपेरी पडद्यावर झाशीच्या राणीचा इतिहास पाहायला मिळणार आहे. या आगामी हॉलिवूड चित्रपटाचे शीर्षक ‘द वॉरियर क्विन ऑफ झांशी’ असे असेल. हा चित्रपट इंग्रजी आणि मराठी भाषेत रिलीज होईल. नुकतेच या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर आणि ट्रेलर रिलीज करण्यात आले आहे.


‘द मॅन हू न्यू इन्फीनिटी’ या चित्रपटामुळे चर्चेत आलेल्या निर्मात्याची ही नवी निर्मिती आहे. हॉलिवूडमध्ये याच चित्रपटातून पदार्पण केलेली अभिनेत्री देविका भिसे यात राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारत आहे. नोव्हेंबर महिन्यात स्वाती भिसे यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


याचवर्षी अभिनेत्री कंगणा राणावतचा ‘मणिकर्णिका’ असे शीर्षक असलेला हिंदी चित्रपट रिलीज झाला होता. त्या चित्रपटाची तुलना करता या चित्रपटात अधिक वास्तववादी आणि निर्भीड लक्ष्मीबाई आपल्याला दिसत आहेत. प्रेक्षकांच्या पसंतीस या चित्रपटाचा ट्रेलर उतरला आहे. हे पोस्टर ट्विटरवर ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी शेअर केले आहे.

Leave a Comment