कृष्णनगरी मथुरेतील मा काली मंदिर


श्रीकृष्णाची जन्मनगरी मथुरेत कृष्णाचे बालपण गेले आणि या नगरीत कृष्णाची अनेक मंदिरे आहेत. त्याशिवाय याच नगरीत असलेल्या प्रसिद्ध रंगेश्वर महादेव मंदिरात मा कालीचे एक मंदिर आहे. हे मंदिर अनेक कारणांनी वेगळे आहे आणि म्हणून मथुरेला भेट देणारे पर्यटक आवर्जून या मंदिराला भेट देतात.

या कालीमातेला रंगेश्वरी मय्या असेही म्हटले जाते. तिची विशेष प्रकारे पूजा केली जाते. आणि भगवान कृष्ण स्वरुपात तिचा शृंगार केला जातो. इतकेच नव्हे तर तिला कान्हा प्रमाणे लोणी आणि मिश्रीचा नैवेद्य दाखविला जातो. अनेकदा ही मय्या पगडी घातलेल्या आणि हातात बासरी असलेल्या रुपात सजविली जाते. यावेळी तिला कृष्ण काली असे संबोधले जाते.


या कालीमातेला एखाद्या नववधू प्रमाणेही नटविले जाते. कधी फुलांचा पोशाख, कधी लेहंगा ओढणी अशी तिची परीधाने असतात. जन्माष्टमीला तिला कृष्णरुपात सजविले जाते तर राधा अष्टमीला राधेचे रूप दिले जाते. कधीतर तिला हनुमानाचे रूप दिले जाते. देश विदेशातून लोक येथे दर्शनासाठी येतात. या कालीमातेचे दर्शन घेतले की भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असा विश्वास आहे.

कालीमातेला पोशाख अर्पण करण्यासाठी मोठी प्रतीक्षा यादी असते. रात्री देवीची शेजारती करून तिला झोपविले जाते.१९९५ मध्ये या देवीची प्राणप्रतिष्ठा करून स्थापना केली गेली आहे.

Leave a Comment