नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले उबेर चालकाचे गाणे


भारतामध्ये टॅलेंट प्रत्येक कोपऱ्यामध्ये सापडते असे नेहमी म्हटले जाते. रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकर यांचे गाणे गाणाऱ्या रानू मंडल या सोशल मीडिया स्टार झाल्या. आता लखनऊच्या एका उबर ड्रायव्हरचा हिंदी गाणे म्हणतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये दिसते की, ड्रायव्हर 90 च्या दशकातील चित्रपट ‘आशिकी’मधील ‘नजर के सामने’ हे गाणे गात आहे. 55 सेंकदांचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांना भलताच आवडलेला दिसत आहे.

ट्विटर युजरने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, मी लखनऊमध्ये उबर ड्रायव्हर विनोदला भेटलो. ते एक शानदार गायक आहेत. मी त्यांना राइडनंतर माझ्यासाठी गाणे गाण्यास सांगितले. कृपया हा व्हिडीओ बघा आणि त्यांना फेमस करा. त्यांचा स्वतःचा युट्यूब चॅनेल देखील आहे.

व्हिडीओ शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, आतापर्यंत 7 हजार पेक्षा अधिक जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर शेकडो युजर्सनी कमेंट्स केल्या आहेत.

अनेक युजर्सनी उबर ड्रायव्हरला शुभेच्छा दिल्या. तर काहीनी त्याचा नंबर देखील मागितला.

Leave a Comment