मुंबई मेट्रोमध्ये निघाली मेगा भरती, असा करा अर्ज


जर तुम्ही सरकारी नौकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई मेट्रोने महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये 1053 पदासांठी अर्ज मागवले आहेत. ही कायम स्वरूपाची नोकरी असून, उमेदवार एमएमआरडीएच्या अधिकृत वेबसाइटवरून जाऊन 16 सप्टेंबर ते 2019 ते 07 ऑक्टोंबर 2019 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

यामध्ये ज्युनिअर इंजिनिअर, सेफ्टी सुपरवायझर, सेक्शन इंजिनिअर, स्टेशन मॅनेजर यांसारख्या 34 पदांचा समावेश आहे.

(Source)

वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी एमएमआरडीएची अधिकृत वेबसाइट mmrda.maharashtra.gov.in पदांची माहित पहावी.

एक महत्त्वाची पात्रता म्हणजे उमेदवाराला मराठी येणे आवश्यक आहे. 10 पर्यंत मराठी न शिकलेल्यांना उमेदवारांना मराठीची परिक्षा द्यावी लागेल.

उमेदवारांच्या निवडीसाठी लेखी परिक्षा घेण्यात येईल, त्यानंतर कागपत्रांची तपासणी करून उमेदवारांची निवड होईल.

Leave a Comment