असे तपासून पहा तुमच्या गाडीची तर फाटली नाही ना पावती


मोटार वाहन कायदा लागू झाल्यापासून चलान संबंधी अनेक प्रकरणं समोर येत आहेत. दंडाच्या रक्कमेत वाढ झाल्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन कमी होताना दिसत आहे. अनेकदा लोक नियमांचे उल्लंघन करतात, मात्र त्यांना त्याची माहितीच नसते. अशामुळे नकळत नियमांचे उल्लंघन केल्यामुळे तुमच्या गाडीचे देखील चलान कापले जाऊ शकते. त्यामुळे तुमच्या गाडीवर कोणते चलन आहे का हे तुम्ही ऑनलाइन देखील तपासू शकता.

वेबसाइट – सर्वात प्रथम तुम्हाला echallan.parivahan.gov.in या वेबसाइटवर जावे लागेल. साइटवर गेल्यानंतर चेक चलान स्टेट्सवर क्लिक करा.

गाडीनंबर टाकून चलान तपासा – येथे तुम्हाला तीन पर्याय दिसतील. चलान नंबर, व्हिकल नंबर, डीएल नंबर हे पर्याय असतील. तुम्ही व्हिकल नंबरवर क्लिक करू शकता. व्हिकल नंबरच्या जागी तुमच्या गाडीचा नंबर टाका, त्यानंतर कॅप्चा टाका. त्यानंतर गेट डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर तुमच्या गाडीवर कुठले चलान आहे की, नाही याची माहिती समोर येईल. याचबरोबर तुम्ही ड्रायव्हिंग लायसेंस नंबर टाकून देखील चलान तपासू शकता.

ऑनलाइन करा पेमेंट – जर वेबसाइवर तुमच्या गाडीवर चलान कापलेले दिसत असेल तर तुम्ही ऑनलाइन पेमेंट करू शकता. यासाठी तुम्हाला पे नॉव या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर ओटीपीद्वारे मोबाईल नंबर व्हेरिफाई करा. त्यानंतर तुम्ही संबंधित राज्याच्या ई-चलान वेबसाइटवर पोहचाल. त्यानंतर तेथे तुम्ही ऑनलाइन पेमेंट करू शकता.

Loading RSS Feed

Leave a Comment