पुन्हा एकदा योगा करतानाचे या अभिनेत्रीचे टॉपलेस फोटो व्हायरल


हॉलीवूड म्हणा अथवा बॉलीवूड सेलिब्रेटी हे आपल्या आयुष्यातील काही महत्वाच्या गोष्टींची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून कायमच देत असतात. त्यांच्या चाहत्यांसाठी अनेकदा याच सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया पोस्ट प्रेरणादायी ठरतात. मग ते त्यांचे डाएट असो, मेकअप असो, त्यांचे लाईफस्टाईल असो किंवा आणखी काही असो त्याचा त्यांच्यावर परिणाम होत असतो. सध्याच्या घडीला सोशल मीडियात अशीच एक अभिनेत्री तिच्या योगसाधनेच्या कौशल्याच्या माध्यमातून अनेकांनाच या विद्येविषयी आणखी जाणून घेण्यासाठी प्रेरित करत आहे. पण तिच्या योगसाधनेचा अंदाज सध्या जास्त चर्चेत आहे.


आश्का गोराडिया असे सोशल मीडियावर योगा करतानाचे टॉपलेस फोटो शेअर करणाऱ्या या अभिनेत्रीचे नाव आहे. ती नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये एक वेगळीच हस्तमुद्रा करताना दिसत आहे.


सोशल मीडियावर तिचा हा टॉपलेस फोटो आश्काने शेअर केला तेव्हा लगेचच त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली शिवाय काहींनी त्यावर कमेंट देण्यासही सुरुवात केली. यापूर्वीही योगसाधनेचे तिचे काही फोटो आश्काने व्हायरल केले आहेत, अनेकांनी ज्याला पसंती दिली होती.


कलाविश्वातील तिच्या इतरही मित्रमंडळींना या विद्येसाठी आणि सुदृढ राहणीमानासाठी योगसाधनेवर प्रभुत्व मिळवणारी आश्का ही प्रेरित करत असते.


अभिनय विश्वात २००२ मध्ये पदार्पण करणाऱ्या आश्काने आतापर्यंत ‘लागी तुझसे लगन’, ‘कुसूम’, ‘सिंदूर तेरे नाम का’, ‘विरुद्ध’ आणि ‘नागिन’ अशा मालिकांमध्ये काम केले आहे. शिवाय ‘नच बलिये’ आणि ‘बिग बॉस’ या रिऍलिटी शोमध्येही तिचा सहभाग पाहायला मिळाला होता.

Leave a Comment