लालूंच्या कुटुंबाला कलहाचे ग्रहण; सूनने सोडले घर


पाटणा: सध्या तुरुंगात चारा घोटाळाप्रकरणी शिक्षा भोगत असलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या घरातील कौटुंबिक कलह आणखीनच चिघळला असून गेल्या वर्षभरापासून लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रताप यादव आणि त्यांची पत्नी ऐश्वर्या यांच्यात वाद सुरु आहे. नुकताच घटस्फोटासाठी न्यायालयात ऐश्वर्याने अर्जही दाखल केला होता. तेजप्रताप आणि ऐश्वर्या यांच्यात लग्न झाल्यानंतर काही महिन्यांतच खटके उडायला लागले होते. नेहमीच लालूंच्या घरातील या कौटुंबिक कलहाची चर्चा रंगताना दिसते.

ऐश्वर्या राय शुक्रवारी आपल्या सासूबाई राबडी देवी यांच्या निवासस्थानाहून रडत रडत बाहेर पडल्यामुळे पुन्हा एकदा हा विषय प्रकाशझोतात आला आहे. घटस्फोटासाठी ऐश्वर्या यांनी अर्ज केला असला तरी बराचवेळ त्या आपल्या सासरी असतात. ऐश्वर्या यांचे वडील राजदचे आमदार चंद्रिका राय यांचे घरही येथून जवळ आहे. पण, आता ऐश्वर्या यांना लालूंच्या घरच्यांनी घरातून निघून जाण्यास सांगितल्याची चर्चा आहे. ऐश्वर्या या प्रकारानंतर घरातून रडत बाहेर आल्या व वडिलांच्या गाडीत बसून निघून गेल्या.

ऐश्वर्या यांनी ऑगस्ट महिन्यात तेजप्रताप यांना अंमली पदार्थांचे व्यसन असल्याचा आरोप केला होता. आपण सासरच्यांना या गोष्टीबद्दल सांगितले. पण, त्यांनी कोणतीही मदत करण्यास नकार दिल्याचे ऐश्वर्या यांनी म्हटले होते. दिल्लीहून मॅनेजमेंज पदवीपर्यंतचे शिक्षण ऐश्वर्या यांनी घेतले आहे. त्यांचे आजोबा दिवंगत दरोगा प्रसाद राय १९७० च्या दशकात बिहारचे मुख्यमंत्री होते. खुद्द लालूंनी हा घटस्फोट होऊ नये यासाठी खूप प्रयत्न केले होते, पण ते व्यर्थ ठरले.

Leave a Comment