‘या’ अभिनेत्रीने केला माझा मानसिक छळ – जॉनी डेप


वादाची किनार फक्त बॉलीवूडलाच असते असे काही नाही, हि किनार आता हॉलीवूडमध्ये देखील लागली आहे. कारण हॉलीवूड सुपरस्टार जॉनी डेप व अ‍ॅक्वामॅन फेम अ‍ॅम्बर हर्ड या दोघांमधील वाद आता शिगेला पोहोचला असून जॉनी डेपची अ‍ॅम्बर हर्ड ही घटस्फोटित पत्नी असून जॉनीवर तिने मानसिक व शारीरिक अत्याचाराचे गंभीर आरोप केले होते. या दोघांनी आरोपांमुळेच घटस्फोट घेतला होता. पुढे हे प्रकरण न्यायालयात गेले; पण जॉनीविरोधात सबळ पुरावे अ‍ॅम्बरला सादर करता आले नाही. परिणामी त्याला निर्दोष मुक्त करण्यात आले. हे प्रकरण आता एवढय़ावरच थांबेल अशी अपेक्षा होती, पण वेगळेच वळण या वादाने घेतले आहे. जॉनीनेच आपल्या घटस्फोटित पत्नीवर आता मानसिक व शारिरीक अत्याचाराचे आरोप केले आहेत. तो गेली दोन वर्ष हे आरोप करत होता. पण त्याने यावेळी अ‍ॅम्बरविरोधात पुरावे सादर केले आहेत.

नाइट पब व पाटर्य़ामध्ये दारू पिऊन माझी पत्नी धुमाकूळ घालायची. याशिवाय तिला अंमली पदार्थाचेही व्यसन होते. तिला अनेकदा रोखण्याचा प्रयत्न मी केला; पण माझ्याबरोबर ती वाद घालायची. अनेकदा मद्यधुंद अवस्थेत असताना तिने मला हातात लागेल त्या वस्तूने मारले आहे. माझी सामाजिक प्रतिष्ठा तिच्या या व्यसनी प्रवृत्तीमुळेच धोक्यात असल्याचे आरोप जॉनीने न्यायालयात केले आहेत. शिवाय हे आरोप सिद्ध करणारे काही पुरावेदेखील त्याच्या वकिलांनी सादर केले आहेत.

या प्रकरणाची जेव्हा सुरुवात झाली असेच काहीसे पुरावे अ‍ॅम्बरने देखील तेव्हा सादर केले होते. परंतु पुढे ते पुरावे खोटे असल्याचे सिद्ध झाले. यानंतर आपली सामाजिक प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल जॉनीने अ‍ॅम्बरवर तब्बल ३४७ कोटी रुपयांचा दावा ठोकला होता. हे प्रकरण सध्या ज्या दिशेने जात आहे. त्या अनुषंगाने पाहता अ‍ॅम्बर हर्डवरील आरोप सिद्ध होतील अशी चर्चा आहे.

अ‍ॅम्बर हर्ड व जॉनी डेप २०१६ साली विवाहबद्ध झाले होते. पण त्यांचा संसार अंतर्गत मतभेदांमुळे वर्षभरातच मोडीस निघाला. दोघे गेली दोन वर्ष एकमेकांविरोधात आरोप करत आहेत. या वादाचे पहिले तीन अंक समाप्त झाले असून जॉनीने सादर केलेल्या पुराव्यामुळे आता चौथ्या अंकाचा प्रारंभ झाला आहे.

Leave a Comment