
काही दिवसांपूर्वीच अभिनेता शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका असलेला कबीर सिंह हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. पण या चित्रपटातील कबीर आणि प्रीतीच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. आता हीच हिच जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. पण यावेळी ही जोडी एखाद्या चित्रपटात नव्हे तर एक प्रेमकथा सांगण्यासाठी येणार आहे.
हे कलाकार इश्क डबल शॉटच्या एपिसोडमधून काही काल्पनिक प्रेमकथा सांगताना दिसणार आहेत. ते प्रसिद्ध झालेल्या एका एपिसोडमध्ये रुह आणि अंश यांची काल्पनिक कथा सांगत आहेत. एका म्यूझिक अल्बमसाठी रुह आणि अंश दोघेही एकत्र येतात आणि पुढे रुहच्या प्रेमात अंश पडतो. पण, नंतर त्याला समजते, की रुह विवाहित आहे. या संपूर्ण एपिसोडमध्ये शाहिद अंश तर कियारा रुहच्या पात्राचे सादरीकरण करताना दिसतात.
पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार शाहिद-कियारा
रुह कथेच्या शेवटी कोणता निर्णय घेणार आणि या कथेचा शेवट काय असणार हे निवडण्याची संधी प्रेक्षकांनाच देण्यात आली आहे. शाहिद आणि कियाराच्या जोडीला यानिमित्ताने प्रेक्षकांना पुन्हा एकदा एकत्र पाहण्याची संधी मिळत असल्याने हा शो त्यांच्या चाहत्यांसाठी नक्कीच खास असणार आहे.
