पाऊस पडावा म्हणून बेडकाचा विवाह आणि थांबावा म्हणून चक्क घटस्फोट

मध्यप्रदेशमध्ये दोन महिन्यांआधी पाऊस पडावा यासाठी बेडूक आणि बेडकीचे लग्न लावण्यात आले होते. त्यानंतर मध्यप्रदेशात एवढा पाऊस झाला की, पुरस्थिती निर्माण झाली. आता या पावसाला थांबवण्यासाठी चक्क या बेडूक आणि बेडकीच्या घटस्फोट करण्यात आला आहे. भोपाळमध्ये ज्यांनी बेडूक-बेडकीचे लग्न लावले होते, त्यांनीच आता त्यांचा घटस्फोट केला आहे.

ओम शिव शक्ती मंडळाच्या लोकांनी भोपाळमधील इंद्रपूरी येथे या दोघांचा घटस्फोट केला. मंडळाच्या एका सदस्याने सांगितले की, आमची प्रार्थना यशस्वी झाली. लग्न लावल्यानंतरच मध्यप्रदेशमध्ये जोरदार पाऊस झाला. मात्र आता पाऊस धोकादायक झाला आहे. हा पाऊस थांबवण्यासाठी आम्ही त्यांचा घटस्फोट केला.

बेडकाच्या लग्नाची ही देशातील पहिलीच घटना नाही. अनेक लोकांचा विश्वास आहे की, बेडूक-बेडकीचे लग्न लावल्याने इंद्रदेव खूष होतो आणि पावसाला सुरूवात होते. मात्र लग्नानंतर बेडूक-बेडकीच्या घटस्फोटाची ही पहिलीच घटना असेल. या घटनेमुळे सर्वच जण हैराण झाले आहेत.

Leave a Comment