व्हिडिओ ; गब्बरने केली विराटची पोलखोल


नवी दिल्ली – आता दिवंगत माजी मंत्री अरुण जेटली यांच्या नावाने भारताचे सर्वात जुने स्टेडियम म्हणून ओळखले जाणारे फिरोज शाह कोटला स्टेडीयम ओळखले जाणार असल्याचे जवाहरलाल नेहरू स्टेडीयम येथे आयोजित दिल्ली क्रिकेट संघाचे (डीडीसीए) अध्यक्ष रजत शर्मा यांनी कार्यक्रमात सांगितले. तसेच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे नाव जेटली स्टेडीयमच्या एका पॅव्हेलियनला देण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या वेळी डावखुरा फलंदाज शिखर धवन आणि इतर खेळाडूही उपस्थित होते. यावेळी विराट कोहलीचे ड्रेसिंगरुममधील एक गुपित टीम इंडिया सलामीवीर गब्बर अर्थात शिखर धवन याने सांगितले आहे. जेव्हा चांगल्या मूडमध्ये विराट असतो तेव्हा कोणती गाणी ऐकतो असा प्रश्न कार्यक्रमामध्ये शिखरला विचारण्यात आला होता. शिखर धवनने तेव्हा त्याचे उत्तर दिले.


शिखर म्हणाला, पंजाबी गाणी विराटला खुप आवडतात. गुरदास मान यांची गाणी तो ऐकतो. रोमँटिक गाणी सांगायची झाली तर, अरिजित सिंहची गाणी त्याला खुप आवडतात. विराटच्या गाण्यांचा प्रश्न आधी संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना विचारण्यात आला होता. मात्र, त्यांनी हा प्रश्न शिखरला विचारण्यात यावा असे सांगितले.

विराट कोहली म्हणाला, एवढा मोठा सन्मान केल्याबद्दल मी रजत शर्मा, भारतीय संघ, दिल्लीचे इतर संघ तसेच बीसीसीआयचा ऋणी आहे. तसेच आपल्या लहानपणीच्या प्रशिक्षकांचे सुद्धा कोहलीने आभार मानले आहेत. मी असा कधी विचारही केला नव्हता की, माझे नाव पॅव्हेलियनला दिले जाईल. हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान असल्याची प्रतिक्रिया कोहलीने व्यक्त केली आहे.

Leave a Comment