नेटकऱ्यांनी शोधून काढले नवीन कुमार सानु


एखाद्या व्यक्तिला एका रात्रीत स्टार बनवण्याची किमया फक्त सोशल मीडियाच साधू शकते याची उदाहरणे आपण पाहिलीच आहेत. सोशल मीडियामुळेच रेल्वे प्लॅटफॉर्मवर गाणे गाणाऱ्या रानू मंडल यांचेही आयुष्य बदलले. सोशल मीडियावर त्यांच्या एका गाण्याचा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आणि त्यांची दखल सेलिब्रिटींनीही घेतली. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडीओ एका तरुणाचा गाणे गातानाचा असून रानू मंडल यांचा मुलगा तर तो तरुण नाही ना, अशी चर्चा होत आहे.

कुमार सानू यांच्या आवाजातील ‘तेरी उम्मीद तेरा इंतजार करते है..’ हे गाणे गाताना या व्हिडीओत हा तरुण दिसत आहे. नेटकऱ्यांना भिंतीला टेकून उभा असलेल्या या तरुणाचा आवाज मंत्रमुग्ध करत आहे. एकीकडे लता मंगेशकर यांची कॉपी असल्याचे रानू मंडल यांना म्हटले जात होते तर या तरुणाला आता कुमार सानू यांची कॉपी असल्याचे म्हटले जात आहे.

या व्हिडीओतील तरुणाला नेटकरी जरी रानू मंडल यांचा मुलगा म्हणत असले तरी याबाबत अद्याप काही मिळू शकलेली नाही. फेसबुकवर या व्हिडीओला दोन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Leave a Comment