तुम्हाला योग्य जोडीदार शोधून देण्यात मदत करणार फेसबुक


आता फेसबुकही तुम्हाला तुमचा योग्य जोडीदार शोधण्यासाठी मदत करणार आहे. गुरुवारपासून जगभरातील २० देशांमध्ये फेसबुकने डेटिंग सेवा सुरु केली आहे. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गने मे महिन्यामध्ये पार पडलेल्या फेसबुकच्या वार्षिक परिषदेमध्ये डेटिंग सेवा सुरु करण्याचा मानस बोलून दाखवल्यानंतर फेसबुकने अवघ्या दोन महिन्यांमध्ये ही सेवा सुरु केल्याची माहिती झकरबर्गनेच फेसबुकच्या माध्यमातून दिली आहे.

याबाबत फेसबुकने केलेल्या सर्वेक्षणानुसार फेसबुक वापरणारे २ दशलक्षहून अधिक युझर्सचे रिलेशनशिप स्टेटस सिंगल आहे. आता फेसबुकने आपल्या खांद्यावर याच सिंगल युझर्सला जोडीदार मिळवून देण्याची जबाबदारी घेतली आहे. मार्क झुकेरबर्ग हि सेवा सुरु झाल्याची माहिती देताना फेसबुक पोस्टमध्ये म्हणतो, जेव्हा वेगवेगळ्या देशांमधील शहरांमध्ये मी फिरतो तेव्हा मला अनेकजण त्यांचा जोडीदार फेसबुकवरुन भेटल्याचे सांगतात. मला ते ऐकताना खूप आनंद होतो.

फेसबुकवर आम्ही अद्याप डेटिंगचे फिचर दिले नव्हते. पण गुरुवारपासून आम्ही अमेरिकेमध्ये फेसबुक डेटिंगची सेवा सुरु केली आहे. ही सेवा कसे काम करते आणि त्याच्या माध्यमातून समान आवड निवड असणारे लोक कशापद्धतीने जवळ येतात हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. या सेवेसंदर्भात आम्ही सुरक्षातज्ज्ञांशी सुरुवातीपासूनच सल्ला घेतला असल्याने ही सेवा पूर्णपणे सुरक्षित आहे. आम्ही पुरेपुर युजर्सच्या गोपनीयतेची काळजी घेतली आहे. ही सेवा जगभरातील २० देशांमध्ये सुरु करण्यात आली असून ती लवकरच इतर देशांमध्येही सुरु केली जाईल.

ही सेवा एकूण २० देशांमध्ये सुरु झाली असली तरी त्यामध्ये भारताचा समावेश करण्यात आलेला नाही. प्राथमिक माहितीनुसार युजर्सच्या फेसबुक अकाऊंट आणि डेटिंगचे अकाऊंट हे वेगळे असणार आहे. युजर्सला मुख्य फेसबुक अकाऊंटवरुन आपली मित्र किंवा मैत्रिण हे डेटिंग फिचर वापरत आहे की नाही याबद्दल कोणतीही माहिती मिळणार नाही.

यासंदर्भात एका इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार फक्त डेटिंग अॅपद्वारे युजर्सना समोरच्या व्यक्तीशी चॅटिंग करता येणार आहे. टिंडर सारख्या डेटिंग अॅपची फेसबुकची डेटिंग सेवा चांगलीच डोकेदुखी ठरणार असल्याची शक्यता तज्ज्ञांनी ही सेवा करण्याची घोषणा झाली त्यावेळीच व्यक्त केली आहे. सध्या डेटिंग सेवा पुरवणाऱ्या अॅपमध्ये टिंडर आघाडीवर आहे.

Leave a Comment