कसोटी क्रिकेटमधून मोहम्मद नबी याची निवृत्ती


चटगांव येथे अफगाणिस्तान विरुद्ध बांग्लादेश यांच्यात कसोटी सामना सुरु असून या दरम्यान अफगाणिस्तानचा ऑलराऊंडर मोहम्मद नबी याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने निवृत्तीचा निर्णय एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटकडे अधिक लक्ष केंद्रीत करता यावे, यासाठी घेतला आहे. कसोटी क्रिकेटमधून नबी निवृत्ती घेणार असल्याची माहिती अफगाणिस्तान संघाचे व्यवस्थापक यांनी दिली आहे. अफगाणिस्तानच्या संघासाठी नेहमीच मोहम्मद नबीने मोठे योगदान दिले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नबीने हा मोठा निर्णय एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटकडे अधिक लक्ष केंद्रीत करण्यासाठी घेतला असल्याचे अफगाणिस्तान संघाचे संस्थापक नाजिम जार अब्दुर्रहीमजाई यांनी सांगितले. नबी याने आतापर्यंत केवळ ३ कसोटी सामने खेळले आहेत. त्याने हा निर्णय कसोटी सामन्यात चांगले प्रदर्शन करता न आल्यामुळे घेतला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 2 कसोटी सामन्यात नबीने केवळ 25 धावा आणि 4 गडी बाद केले आहेत.

टी-20 क्रिकेटमध्ये मोहम्मद नबीने नेहमी चांगले प्रदर्शन करुन दाखवले आहे. आगामी टी-20 विश्वचषक नबी खेळणार असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियात पार पडणार आहे. अफगाणिस्तान आयसीसी विश्व टेस्ट क्रिकेट स्पर्धेचे भाग नाहीत, कारण गुणतालिकेतील वरील 9 संघाला या स्पर्धेत संधी मिळते. अफगाणिस्तानचा पुढील सामना वेस्टइंडीज संघासोबत देहरादून येथे होणार आहे.

Leave a Comment