व्हिडीओ : मालगाडीचे डबे अंगावरून जाऊनही त्या राहिल्या जीवंत


कलबुर्गी – वेळ आली होती पण काळ आला नव्हता अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. त्याचाच प्रत्यय नुकताच कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील एका रेल्वेस्थानकावरील नागरिकांना आला आहे. एका महिलेच्या अंगावरून रेल्वे रूळ ओलाडंताना मालगाडी गेली. पण त्या महिलेला संपूर्ण रेल्वे अंगावरुन गेल्यानंतर देखील कोणतीच दुखापत झाली नाही.

मनीबाई चंदर असे संबधीत महिलेचे नाव आहे. मनीबाई चित्तापूर रेल्वे स्थानकात रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना घसरुन खाली पडल्या. तेवढ्यात एक मालगाडी वेगाने आली. मनीबाई भांबावलेल्या असातानाही हुशारीने रुळावरील जमिनीवर पडून राहिल्या. यावेळी अक्षरशः त्याच्या अंगावरून धडधडत आलेल्या मालगाडीचे डबे गेले. पण त्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नसून त्या बचावल्या आहेत.

(व्हिडीओ सौजन्य – इंडिया टुडे)
या दरम्यान फलाटावर उभे असणाऱ्या सगळ्यांनी या घटनेवेळी आपला श्वास रोखून धरला होता. सगळ्यांनी असाच विचार केला की त्या आता काही वाचत नाही. पण काळ आला होता पण त्यांची वेळ आली नव्हती. मनीबाई रेल्वे गेल्याबरोबर रुळाच्यामधून उठून बाहेर आल्या आणि लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यांच्या आश्चर्यकारक सुटकेनंतर लोकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यांना कोणतीही इजा न झाल्यामुळे लवकरच सोडण्यात आले आहे.

Leave a Comment