काल्कीने दिला आपल्या नव्या नात्याला दुजोरा


बॉलिवूड अभिनेत्री काल्की कोचायलिन पुन्हा चर्चेत आली असून पण ती यावेळी आपल्या चित्रपटामुळे नव्हेतर ती तिच्या नव्या बॉयफ्रेंडमुळे चर्चेत आली आहे. ती गेल्या १० वर्षांपासून बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून काम करत आहे. आपल्या इन्स्टाग्रामवर तिने मित्रासोबतचा फोटो शेअर करुन आपल्या नव्या नात्याला दुजोरा दिला आहे.

View this post on Instagram

It's always a Sunday when I'm with my favourite caveman🥰

A post shared by Kalki (@kalkikanmani) on


शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, जेव्हा आपल्या केवमॅनसोबत (गुहेत राहणारा व्यक्ती) मी असते तेव्हा मला प्रत्येक दिवस रविवार असल्यासारखा वाटतो. पण तिने तो व्यक्ती कोण आहे याचा खुलासा केलेला नाही. पण ती त्याच्यासोबत खूश दिसत असून आपल्या बॉयफ्रेंडसोबत सुमुद्र किनारी किस करताना दिसत आहे.

२००९ मध्ये ‘देव डी’ या चित्रपटाच्या माध्यमातून काल्की कोयचलिनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर २०११ मध्ये ती दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत विवाहबद्ध झाली होती. पण त्यांचा संसार केवळ ४ वर्षेच टिकू शकला. २०१५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाल्यानंतर अनुरागच्या आयुष्यात दुसरी स्त्री आली पण कोणाशीही काल्किचे नाव जोडले गेले नव्हते. घटस्फोटानंतरही दोघांमधील मैत्री कायम आहे. काल्की सेक्रेड गेम्सच्या पहिल्या भागात झळकली होती. आता तिच्या आयुष्यात तिला आवडणारा व्यक्ती आला आहे.

Leave a Comment