‘झोया फॅक्टर’चे पहिले वहिले गाणे रिलीज


लवकरच अभिनेत्री सोनम कपूर आणि दुलकर सलमान ही जोडी आपल्याला ‘झोया फॅक्टर’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. लवकरच हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता नुकतेच या चित्रपटातील पहिले गाणे रिलीज करण्यात आले आहे. सोनमच्या जन्मापासून ती भारतीय संघासाठी कशाप्रकारे ‘लकी चार्म’ ठरते हे या गाण्यात दाखविण्यात आले आहे.

आपल्याकडे काही ना काहीतरी ‘लकी चार्म’ पाहिजे, अशी प्रत्येकालाच इच्छा असते. जर हे ‘लकी चार्म’ प्रत्यक्षात आपल्याला मिळाले, तर आपले नशीब बदलायला वेळ लागत नाही. अशाच आशयावर आधारित असलेले हे गाणे आहे. सोनम कपूर म्हणजे ‘झोया’ कशाप्रकारे ‘लकी चार्म’ बनते हे ‘झोया फॅक्टर’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

हे गाणे रघुवीर यादव आणि शंकर महादेवन यांनी गायले आहे. तर, या गाण्याला संगीत शंकर-एहसान- लॉय यांच्या तिकडीने दिले आहे आणि या गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहेत.

सोनमने अलिकडेच ट्विटर अकाऊंटवर या गाण्याचा टीझर शेअर केला होता. तेव्हापासून या गाण्याची चाहत्यांना आतुरता होती. अनुजा चव्हाण यांच्या २००८ साली आलेल्या कादंबरीवर ‘झोया फॅक्टर’ हा चित्रपट आधारित आहे. सोनम आणि दुलकर शिवाय या चित्रपटात अंगद बेदी देखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. अभिषेक शर्माचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट २० सप्टेंबरला प्रदर्शित होईल.

Leave a Comment