अमृताच्या या मराठमोळ्या लुकचे सोशल मीडियात कौतुक


आपल्या अभिनयासोबतच आपल्या सौंदर्याची छापही अभिनेत्री अमृता खानविलकरने चाहत्यांवर पाडली आहे. ती तिचे बरेच फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या अमृतानेही गणेशोत्सवानिमित्त मराठमोळ्या लूकमध्ये तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. सोशल मीडियात तिचा हा लूक पाहुन तिच्यावर लाईक्सचा वर्षाव होत आहे.


साड्यांची अमृताला प्रचंड आवड आहे. तिची ही आवड तिने शेअर केलेल्या फोटोमधूनही पाहायला मिळते. तिने हे फोटो मराठमोळा श्रृंगार करुन शेअर केले आहेत. गणेशाच्या मूर्तीसमोरचाही एक फोटो तिने शेअर केला आहे.

View this post on Instagram

#आशीर्वाद

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on


काही दिवसांपूर्वीच अमृता छोट्या पडद्यावरील ‘जीवलगा’ मालिकेत काव्याच्या भूमिकेत झळकली होती. तिच्या त्या भूमिकेचे फार कौतुकही झाले. तिचा स्टायलिश अंदाज या मालिकेतही पाहायला मिळाला होता. तसेच, आता ‘खतरों के खिलाडी’च्या दहाव्या पर्वातही ती सहभागी होणार आहे.

Leave a Comment