आलिया नटली बाई सुपारी फुटली


सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आहे. त्यातच आलियाने आता अनुष्काची जागाही पटकावली आहे. एका फॅशन डिझायनर हाऊससाठी मॉडेल म्हणून अनुष्का शर्मा जाहिराती करत होती. तिच्याजागी आता आलियाची वर्णी लागली आहे.

आलियाने नुकतेच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ब्रायडल लूकमधील आपले काही फोटो शेअर केल्यानंतर आलियाच्या या जाहिरातीचा आता नवरीच्या लूकमधील व्हिडिओही समोर आला आहे. आपल्या बिनधास्त आणि डॅशिंग अंदाजाने ओळखली जाणारी आलिया या जाहिरातीतही अशाच अंदाजात दिसत आहे.

आलियाच्या जबरदस्त अभिनयाची आणखी एक झलक काहीशी विनोदी आणि काहीशी भावनिक असणारी ही जाहिरात आहे. आलियाने नुकतेच तिच्या आगामी ‘सडक २’ चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण केले आहे. तसेच, तिचा ‘प्राडा’ हा म्युझिक अल्बमही रिलीज झाला आहे. तिचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटदेखील चर्चेत आहे. ती रणबीर कपूरसोबत या चित्रपटात झळकणार आहे.

Leave a Comment