एसबीआय लवकरच लाँच करतेय रूपे क्रेडीट कार्ड


देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय लवकरच रूपे क्रेडीट कार्ड लाँच करणार आहे. भारतीय राष्ट्रीय भुगतान निगमने विकसित केलेले हे रूपे कार्ड स्थानिक गेटवे प्रणाली युपीआय, आयएमपीएस, भीम सारख्या अनेक विकल्पासाठी उपलब्ध होणार आहे. या प्रकारची ही पहिलीच घरेलू डेबिट क्रेडीट कार्ड प्रणाली आहे.

एसबीआयचे कार्ड विभाग प्रमुख, सीइओ हरदयाळ प्रसाद या संदर्भात माहिती देताना म्हणाले, चालू वित्त वर्षात रूपे क्रेडीट कार्ड लाँच केले जाईल. रूपे लोकप्रिय होत आहे आणि ते अधिकाधिक उपयोगात आणले जावे यासाठी खास प्रयत्न केले जाणार आहेत. देशात एक मोठा राष्ट्रवादी गट उदयास आला असून तो रुपे ला प्राधान्य देत आहे. एसबीआय त्यांच्या एकूण कार्ड पैकी १/३ पेक्षा जास्त कार्डस रूपे मध्येच जारी करत आहे. सध्या रूपे सिंगापूर, भूतान आणि युएइ मध्ये ग्राह्य ठरले आहे.

Leave a Comment