आज कुलभूषण जाधन यांना मिळणार भारतीय दूतावासाची मदत


नवी दिल्ली – भारतीय नौदलातील अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यावर हेरगिरीचे कथित आरोप करणाऱ्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना दूतावासाची मदत देण्यास होकार दिला आहे. भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांना सोमवारी (२ सप्टेंबर) जाधव यांना भेटू दिले जाणार असल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.

कुलभूषण जाधव यांना दूतावासाची मदत देणार असल्याची माहिती पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनी ट्विटवरून दिली. २ सप्टेंबर रोजी भारतीय दूतावासाची भारतीय नौदलातील अधिकारी कुलभूषण जाधव यांना मदत दिली जाणार आहे. ही मदत व्हिएन्ना करार, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे आदेश आणि पाकिस्तानी कायद्यानुसार देण्यात येत आहे. सध्या पाकिस्तानच्या कैदेत कुलभूषण जाधव असल्याचे फैसल यांनी म्हटले आहे.

दुसऱ्यांदा जाधव यांच्या मदतीचा प्रस्ताव जम्मू काश्मीरमधून कलम ३७० आणि ३५ ए हटवल्यांपासून पाकिस्तानने दिला आहे. पाकिस्तानने यापूर्वी भारतीय अधिकाऱ्यांना कुलभूषण जाधव यांची भेट घेण्याची परवानगी दिली होती. पण त्यावेळी अनेक अटी पाकिस्तानने टाकल्या होत्या. पाकिस्तानी अधिकारी जाधव आणि भारतीय अधिकाऱ्यांच्या भेटीवेळी हजर राहिल, भेटीच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात येतील तसेच जाधव आणि अधिकाऱ्यांमध्ये होणारी चर्चा रेकॉर्ड करण्यात येईल आदी अटी पाकिस्तानने लादण्याचा प्रयत्न केला होता.

भारताने पाकिस्तानचा प्रस्ताव आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे कोणत्याही अटी न ठेवता खुल्या वातावरणात दूतावासाच्या अधिकाऱ्यांना भेटू द्यावे, असे सांगत फेटाळून लावल्यानंतर दूतावासाच्या मदतीचा प्रस्ताव आता नव्याने देण्यात आला आहे.

Leave a Comment