या विशेष कारणामुळे सोशल मीडियात व्हायरल झाले हे बाळ


जन्मलेल्या बाळाला तर तुम्ही अनेकदा पाहिले असेल, मात्र त्या बाळाच्या डोक्यावर घनदाट केस होती, असे आठवते का तुम्हाला ?  नाही ना. मात्र जापानमध्ये जन्मताच एका मुलीच्या डोक्यावर घनदाट केस आहेत.


जापानच्या या लहान मुलीचे नाव चांको असे आहे. मागील वर्षी 23 डिसेंबरला तिची जन्म झाला असून, जन्मताच तिच्या डोक्यावर घनदाट केस आहेत.


8 महिन्यांची चांको आज इंटरनेट स्टार आहे. तिच्या आईने तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच व्हायरल झाले.


जन्मताच केस असलेल्या या मुलीच्या जन्मावेळी डॉक्टर देखील उत्साही होते. लोकांच्या प्रतिक्रिया बघून तिच्या आईने केस कापण्याचा निर्णय घेतला होता. मात्र नंतर त्यांनी तिचे केस कायम ठेवले.


तिच्या या प्रसिध्दीमुळे तिला पॅंटेन कॅम्पेनची जाहीरात देखील मिळाली. इंस्टाग्रामवर या छोट्या बेबीचे तब्बल 3 लाख 90 हजार फॉलोवर्स आहेत. ही छोटी मुलगी एखाद्या मॉडेल पेक्षा कमी नाही.

Leave a Comment