गुड न्यूज देणार दीपिका पादुकोण !


हिंदी सिनेसृष्टीत रणवीर आणि दीपिका ही जोडी हॉट कपल म्हणून ओळखले जाते. दीपिका पादूकोण गरोदर असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. सध्या सोशल मीडियावर त्यांचे काही व्हिडीओ आणि फोटो समोर आल्यानंतर दीपिका गरोदर असल्याच्या चर्चांना जोर चढला आहे. यावेळी जे कपडे दीपिकाने घातले आहेत त्यावरुन हा अंदाज लावला जाता आहे.

यावेळी दीपिकाने सैल कपडे घातले होते. त्यामुळे दीपिका बेबी बंप लपवण्यासाठी अशा प्रकारचे कपडे घालत असल्यामुळे बोलले जात आहे. पण सर्व चर्चा खऱ्या आहेत की अफवा याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. दीपिका किंवा रणवीरने अद्याप प्रेग्नन्सी बाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.


दीपिका पादूकोण मागच्या काही दिवसांपासून अतरंगी आणि ढगळ्या कपड्यांमध्ये दिसत असल्यामुळे तिला ट्रोलही केले गेले आहे. नेहमीच स्टायलिश आणि फिगर डिफायनिंग कपडे घालणारी दीपिका मागच्या काही दिवसांपासून सैल कपडे का घालत आहे यावर सगळीकडेच चर्चा होती. हे दोघेही नुकतेच लंडनमध्ये एकमेकांच्या हातात हात घालून दिसले. यावेळी दीपिकाने नियॉन ग्रीन कलरचा सैल ड्रेस घातला होता.


दीपिका प्रेग्नन्ट असल्याचा अंदाज दीपिका आणि रणवीरच्या या फोटोंवरून लावला जात आहे. एका युजरने लिहिले, अशा कपड्यांमध्ये दीपिका स्वतःला झाकून घेत बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करत आहे. तर आणखी एका युजरने लिहिले, आपण गरोदर असल्याचे दीपिका मीडियापासून लपवण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या सोशल मीडियावर अशाचप्रकारच्या अनेक कमेंट पहायला मिळत आहेत.

दीपिकाने काही दिवसांपूर्वी रणवीर सिंहच्या लाइव्ह व्हिडीओवर कमेंट करताना हॅलो डॅडी त्याला म्हटले होते. तेव्हापासून तिच्या प्रेग्नन्सीच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. तिने या कमेंटमध्ये लहान बाळाचा इमोजी सुद्धा वापरली होती. त्याचबरोबर यावर अभिनेता अर्जुन कपूरने सुद्धा कमेंट केली होती. त्यावरुनच दीपिका प्रेग्नन्सीच्या चर्चा सुरू झाल्या पण यावर अद्याप दीपिकाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Leave a Comment