उद्यापासून महागणार रेल्वेची ई-तिकिटे


आयआरसीटीसीकडून ई-तिकिटे खरेदी करणे आता महाग होणार आहे. कारण एका आदेशानुसार भारतीय रेल्वेने 1 सप्टेंबरपासून सेवा शुल्क पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आयआरसीटीसीने 30 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, आयआरसीटीसी आता वातानुकूलित श्रेणी ई-तिकिटांवर 15 रुपये आणि प्रथम श्रेणीसह सर्व वातानुकूलित ई-तिकिटांवर 30 रुपये शुल्क आकारेल. ज्यात वस्तू आणि सेवा कर वेगळा असेल.

दरम्यान, तीन वर्षांपूर्वी भाजपा नेतृत्वाखालील एनडीए सरकारने डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व्हिस फी मागे घेतली होती. यापूर्वी आयआरसीटीसी वातानुकूलित श्रेणी ई-तिकिटांवर 20 रुपये आणि सर्व वातानुकूलित श्रेणी ई-तिकिटांवर 40 रुपये सेवा शुल्क आकारत असे. या महिन्याच्या सुरूवातीस रेल्वे तिकीटावर प्रवाशांकडून सेवा शुल्क वसूल करण्यासाठी रेल्वे बोर्डाने भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनला (आयआरसीटीसी) मान्यता दिली.

Leave a Comment