Video : याला म्हणतात…काळ आला होता पण वेळ आली नव्हती


काळ आला होता पण वेळ आली नव्हती, असे म्हणतात ना. असेच काहीसे हैद्राबाद येथील रेल्वे स्टेशनवर घडले.  हैद्राबादच्या एका रेल्वे स्टेशनवर हैराण करणारा प्रकार घडला आहे. एका काँस्टेबलने चालत्या ट्रेनच्या मध्ये अडकलेल्या एका प्रवाशाचा थोडक्यात जीव वाचवला. रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) च्या एका ऑन-ड्युटी काँस्टेबलने हैद्राबादच्या रेल्वे स्टेशनवर चालती ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या प्रवाशाला बाहेर काढत त्याचे प्राण वाचवले.


12 सेंकदाच्या या थरकाप उडवणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसून येते की, कशाप्रकारे काँस्टेबल रेल्वेबरोबरच धावत त्या प्रवाशाला बाहेर काढतो. काँस्टेबलने चपळता दाखवत त्या प्रवाशाचे प्राण वाचवले. त्या प्रवाशाला थोडी इजा झाली आहे.


काँस्टेबलच्या या कामगिरीनंतर सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. अनेकांनी काँस्टेबलच्या या कामगिरीचे कौतूक केले.


एका युजरने रेल्वे मंत्री पीयूष यांना टॅग करत त्यांना चांगली उपकरणे देण्याचे देखील आवाहन केले.

Leave a Comment