…म्हणून आनंद महिंद्रा कधीच ‘नागा महिला बटालियन’शी घेणार नाहीत पंगा


खड्ड्यात फसलेली बोलेरो कार नागा महिला सैनिक बाहेर काढतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या नागा महिला सैनिकांची ही शक्ती बघून राजकारण्यांपासून ते महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा हे देखील त्यांची स्तुती करण्यापासून स्वतःला थांबवू शकले नाहीत.

नागालँडमधील भाजपचे आमदार मम्होनलूमो किकोन यांनी सर्वात प्रथम हा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्यांनी उद्योगपती आनंद महिंद्रा, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू, गृहमंत्री अमित शाह आणि स्मृती इराणी यांना देखील टॅग केले.


मम्होनलूमो किकोन यांनी व्हिडीओ शेअर करत लिहिले की, नागा महिला बटालियन खड्डयामध्ये फसलेल्या महिंद्रा बोलेरो कार उचलत आहे. हा जूना व्हिडीओ असून, लोकांनी जास्तीत जास्त बघितला पाहिजे.


त्यानंतर आनंद महिंद्रा यांनी देखील हा व्हिडीओ रिट्विट करत लिहिले की, मला नाही माहित बोलेरो खड्ड्यात का पडली आहे.  मात्र मला आनंद आहे की, कार काढण्यासाठी आजूबाजूला अशा सक्षम महिला होत्या. आणि हा मी एवढा वेडा नाही की, नागा महिला बटालियनशी पंगा घेईल.


केंद्रीय क्रिडा मंत्री किरण रिजिजू यांनी देखील हा व्हिडीओ शेअर केला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 3 लाख लोकांनी बघितले असून, 13 हजार जणांनी रिट्विट केला आहे.

Leave a Comment