अ‍ॅपलचे लक्ष्य भारत, सुरू करणार ऑनलाइन स्टोर


अ‍ॅपल सध्या भारतात आपले सर्व प्रोडक्टस आयफोन, मॅकबुक आणि आयपॅड्स हे सर्व थर्डपार्टी रिसेलर्स आणि ई-रिटेलर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टद्वारे विक्री करते. लवकरच ही पध्दत बदलण्याची शक्यता असून, अ‍ॅपल कंपनी लवकरच भारतात स्वतःचे ऑनलाइन स्टोर उघडण्याची शक्यता आहे.

एका रिपोर्ट्सनुसार, अ‍ॅपल लवकरच भारतात स्वतःचे ऑनलाइन स्टोर उघडू शकते. हे स्टोर मुंबईमध्ये असण्याची शक्यता आहे. हे स्टोर 2020 पर्यंत सुरू होऊ शकते.

अ‍ॅपलने म्हटले आहे की, आम्ही आमच्या भारतीय ग्राहकांवर प्रेम करतो आणि आम्ही त्यांना ऑनलाइन आणि इन-स्टोर सेवा देण्यास उत्सुक आहोत. आम्ही भारतीय ग्राहकांना तोच अनुभव देऊ इच्छितो जो जगभरातील अ‍ॅपलच्या ग्राहकांना मिळतो. आम्ही तयारी करत आहोत.

याचबरोबर येत्या 10 सप्टेंबरला अ‍ॅपल नवीन आयफोन लाँच करणार आहे. या फोनची लाँचिंग स्टीव जॉब्स थेअटरमध्ये होईल. लीक झालेल्या रिपोर्ट्सनुसार, या इवेंटमध्ये आयफोन 11, आयफोन 11 प्रो आणि आयफोन 11 प्रो मॅक्स लाँच केला जाऊ शकतो.

Leave a Comment