अखेर रिलीज झाले रानू मंडल आणि हिमेश रेशमियाचे बहुचर्चित गाणे


सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे रानू मंडल यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. त्यांच्या त्या गाण्याच्या व्हायरल व्हिडिओने त्यांना एवढी प्रसिद्धी मिळवून दिली की त्यांना काही दिवसांतच चक्क प्रसिद्ध गायक हिमेश रेशमिया यांनी आपल्या आगामी चित्रपटात गाण्याची संधी दिली. गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेले ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणे अखेर रिलीज करण्यात आले आहे.

हिमेश रेशमियाने काही दिवसांपूर्वी रानू मंडल यांचे हे गाणे गातानाचा व्हिडिओ शेअर केला होता. हे गाणे गायक हिमेश रेशमियाच्या आगामी चित्रपट ‘हॅप्पी हार्डी अँड हीर’मधील आहे. हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच रानू मंडल यांच्या आवाजातील हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. युट्यूबवर हे गाणे रिलीज होताच लाखो लोकांनी हे गाणे पाहिले आहे.

Leave a Comment