चला भेटूया छिछोरे गँगला


लवकरच तरुणांची मने जिंकण्यासाठी कॉलेजमधील ग्रुप फ्रेंडशिपवर आधारित छिछोरे हा चित्रपट येत आहे. श्रद्धा कपूर आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. प्रेक्षकांची चांगलीच पसंती चित्रपटाचा ट्रेलर आणि आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या गाण्यांना मिळाली.

यानंतर चित्रपटातील एक व्हिडिओ आता शेअर करण्यात आला आहे. तुम्हालाही तुमच्या कॉलेजमधील दिवसांची २२ सेकंदाचा हा व्हिडिओ आठवण करुन देईल, हे नक्की. हा व्हिडिओ दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी शेअर केला आहे. भेटा हॉस्टेल ४च्या कमीन्यांना, म्हणजेच आमच्या छिछोऱ्यांना, असे त्यांनी व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

या चित्रपटात सुशांत सिंह अनी नावाचे पात्र साकारणार आहे. तर श्रद्धाने यात माया नावाचे पात्र साकारले आहे. या चित्रपटात सुशांत आणि श्रद्धाशिवाय वरुण शर्मा, नवीन शेट्‌टी, सहर्ष कुमार, ताहिर राज भसीन, तुषार पांडे आणि प्रतीक बब्बर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत.

Leave a Comment