महाराष्ट्रात करमुक्त झाले अक्षयचे ‘मिशन’


नुकताच ‘मिशन मंगल’ या चित्रपटातून अभिनेता अक्षय कुमार प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रेक्षकांची भारताच्या मंगळ मोहिमेवर आधारित या चित्रपटाला चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे. अशात महाराष्ट्रात आता हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे.


याबद्दलची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत दिली आहे. आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर १६८ कोटींची कमाई मिशन मंगलने केली आहे. अक्षय कुमारशिवाय या चित्रपटात तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, विद्या बालन, नित्या मेनन आणि क्रिती कुल्हारी या अभिनेत्रीही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

या चित्रपटात मंगळ मोहिमेत महिला वैज्ञानिकांचे असलेले योगदान आणि त्यांच्या जीवनातील इतर समस्या बाजूला ठेवून या मिशनसाठी चाललेली त्यांची धडपड पाहायला मिळते. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने २९ कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट अक्षयच्या फिल्मी करिअरमधील पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

Leave a Comment