या बोल्ड अभिनेत्रीसोबत स्क्रिन शेअर करणार भाऊ कदम


आता एका विनोदी चित्रपटात ‘H2O कहाणी थेंबाची’ मधील सिया म्हणजेच शीतल अहिरराव झळकणार आहे. आता विनोदवीर भाऊ कदमसोबत अभिनयाची जुगलबंदी ‘वॉक तुरु तुरु’, ल’ई भारी पोरी’, ‘इश्काचा किडा’ यांसारख्या धमाल म्युझिक अल्बम्समधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली शीतल करणार आहे. ‘व्हीआयपी गाढव’ या आगामी चित्रपटात शीतल आणि भाऊ नवरा-बायकोच्या भूमिकेत दिसतील.


भाऊ कदमसारख्या मातब्बर कलाकारासमवेत काम करताना शीतलचा ही कस लागला असावा यात काही शंका नाही. या चित्रपटात शीतल पहिल्यांदाच एका गावठी बाईच्या भूमिकेतून प्रेक्षकांना हसवणार आहे. १३ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात संजय पाटील दिग्दर्शित ‘व्हीआयपी गाढव’ प्रदर्शित होत आहे.


तिचा ‘व्हीआयपी गाढव’च्या निमित्ताने सामना भाऊ कदमशी झाला. भल्या-भल्या कलाकारांना विनोदी भूमिका वठवणे कठीण जाते त्यात हा माझा जॉनर तर नाहीच आणि माझ्यासमोर त्यात कॉमेडीचा किंग भाऊ म्हटल्यावर माझ्यावर थोडेसे दडपण आलेच, पण मला भाऊंनी सांभाळून घेतले. माझ्यासाठी काशी ही भूमिका कायम स्मरणात राहावी अशीच आहे.


मला प्रेक्षकांनी आतापर्यंत मॉर्डन रूपात पाहिले आहे आता त्यांना माझा गावरान ठेका पाहायला मिळणार आहे. शीतल अहिररावसोबत दादा कोंडके शैलीतला ‘व्हीआयपी गाढव’ हा विनोदी चित्रपटात भाऊ कदम, विजय पाटकर आणि भारत गणेशपुरे आदी दमदार कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका असणारा आहेत.

Leave a Comment