या रेल्वे स्थानकात केळी विकल्यास भरावा लागेल दंड


लखनऊ – केळांपेक्षा जास्त प्राथमिकता स्वच्छतेवर देताना लखनऊ स्थानकावरील रेल्वे अधिकारी दिसत आहेत, कारण त्यांचे असे मानने आहे की, स्थानकात केळींमुळे रेल्वे घाण पसरते. त्यामुळेच त्यांनी रेल्वे स्थानकावर फळांच्या विक्रीवर बंदी लावली आहे. त्याचबरोबर त्यांनी कोणीही नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा देखील दिला आहे. या अधिकाऱ्यांच्या नियमामुळे फळे विक्रेते आणि नागरिक मात्र नाराज झाले आहेत.

याबाबत माहिती देतान चारबाग स्थानकावरील एका विक्रेत्याने सांगितले की, रेल्वे स्थानकावर मी मागील 5 ते 6 दिवसांपासून केळ्यांची विक्री केली नाही. याच्या विक्रीवर प्रशासनाने बंदी घातली आहे. केळी स्वस्त असल्यामुळे गरीब नागरीक हे खरेदी करायचे, पण या निर्णयामुळे सर्व नाराज आहेत.

लखनऊ आणि कानपूरदरम्यान रोज प्रवास करणाऱ्या एका प्रवाश्याने सांगितले की, केळी खूप स्वस्त, आरोग्यास चांगले आणि सुरक्षित फळ आहे. हा नियम अतिशच चुकीचा आहे की, केळांमुळे घाण पसरते. असे असेल तर सार्वजनिक स्वच्छालय खूप घाण असतात, त्यांच्यावरही कारवाई केली पाहिजे. पाण्याच्या बाटल्या आणि स्नॅक्सवरही बंदी घातली पाहिजे.

Leave a Comment