आनंद महिंद्रा म्हणतात… यामुळे खरी चॅम्पियन आहे पी. व्ही. सिंधू


जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद पटकवणारी पी. व्ही. सिंधू सध्या सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरली आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सिंधूच्या ट्रेनिंगचा व्हिडीओ शेअर करत ती खरच चॅम्पियन का आहे ते सांगितले आहे. पी. व्हीं. सिंधूचा हा वर्कआउट बघून आनंद महिंद्रा देखील हैराण झाले.

आनंद महिंद्रा यांनी सिंधूच्या ट्रेनिंगचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत लिहिले की, कठोर, मला तर हा व्हिडीओ बघूनच दमल्यासारखे झाले. मात्र हे बघून नक्कीच ती वर्ल्ड चॅम्पियन का आहे हे रहस्य राहिलेले नाही. संपुर्ण देश या खेळाडूच्या पावलावर पाऊल टाकून चालेल आणि आशा आहे की, सर्वोच्च स्थानावर पोहचण्यासाठी ज्या  जिद्दीची गरज आहे, त्यातून मागे हटणार नाही.

स्विर्झलँड येथे झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे. सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहाराला २१-७, २१-७ असा सरळ पराभव केला.

आपल्या या विजयानंतर सिंधूने तिचे आई-वडिल, प्रशिक्षक आणि ट्रेनर या सर्वांचे आभार मानले. विजयानंतर तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्रिडा मंत्री किरण रिजिजू यांची देखील तिने भेट घेतली.

Leave a Comment