‘छिछोरें’चे हे गाणे तुम्हाला आठवण करुन देईल कॉलेजमधील दिवस


लवकरच छिछोरे या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि श्रद्धा कपूर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाची कथा कॉलेजमधील मित्रांच्या एका ग्रुपवर आधारित असणार आहे.

या मैत्रीची झलक दाखवणारा चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता. यानंतर चित्रपटातील फिकर नॉट हे गाणे देखील तुमच्या भेटीला आले होते. आता कॉलेज लाईफमधील मित्र मिड लाईफमध्ये आल्यानंतर मित्रांच्या आणि त्यांच्यासोबत केलेल्या मस्तीच्या आठवणीत बुडालेले या नव्या गाण्यात दिसत आहेत.

या गाण्याचे वो दिन असे शीर्षक असून गाण्याला तुषार जोशीने आवाज दिला आहे. तर गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहेत. प्रत्येकाला आयुष्यातील पहिले प्रेम, कॉलेजमधील पहिल्या दिवसाची मैत्री आणि कॉलेज लाईफमधील मस्तीची आठवून करुन देणार हे गाणे प्रेक्षकांची मने नक्कीच जिंकेल.

Leave a Comment