काश्मीर प्रश्नी कोणत्याही थराला जाऊ – इम्रान खान


नवी दिल्ली – भारताला पुन्हा एकदा पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी धमकी दिली असून इम्रान खान यांनी नुकतेच पाकिस्तानी जनतेला संबोधित केले. त्यांनी यावेळी भारतावर निशाणा साधला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काश्मीरमधील कलम 370 रद्द करून ऐतिहासिक चूक केली आहे. काश्मीर मुद्दा आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायासमोर मांडला असून आपण काश्मीर प्रश्नी कोणत्याही थराला जाऊ, असे जनतेला संबोधित करताना इम्रान खान म्हणाले.

पाकिस्तानला काश्मीर मुद्याचे आंतरराष्ट्रीयकरण करण्यात यश आले असून आम्ही याप्रकरणी जगातील प्रमुख देशांशी चर्चा केली. त्याचबरोबर यावर परराष्ट्रीय माध्यमांनी चर्चा केल्यामुळे संयुक्त राष्ट्रामध्ये 1965 नंतर आता काश्मीर मुद्द्यावर चर्चा झाली. काश्मीरचा राजदूत म्हणून मी काम करेन. जरी कोणता देश काश्मीरी नागरिकांसोबत उभा नाही राहीला तरी पाकिस्तान राहील. दोन्ही राष्ट्राकडे अण्वस्त्र आहेत. जर हे प्रकरण युद्दापर्यंत गेले तर याचा परिणाम जगावर होईल आणि या युद्धाला जग जबाबदार असेल, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.

जेव्हा सत्तेमध्ये आमचे सरकार आले तेव्हा रोजगार निर्माण करने हा आमचा पहिला प्रयत्न होता. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांना जल आणि वायूमधील परिवर्तन प्रभावित करतो. आम्हाला यासाठी भारतासोबत मैत्री करायची होती. जर भारताने एक पाऊल पुढे टाकले तर आम्ही दोन पाऊल टाकू असे मी म्हणालो होतो. आम्ही भारतासोबत जेव्हा काश्मीर मुद्यावर बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते दहशतवादावर बोलत राहीले. त्यानंतर त्यांच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी पाकिस्तानविरोधी अभियान राबवले, त्यांचे वेगळेच धोरण असल्यामुळे त्याच्याशी चर्चा न करण्याचे ठरवले. अशी टीका इम्रान खान यांनी भारतावर केली.

Leave a Comment