ड्रीम गर्लमधील ढगाला लागली कळ..गाण्यावर आयुष्मानसोबत रितेशने धरला ठेका


मराठी सिनेसृष्टीचे पहिले सुपरस्टार दादा कोंडके यांनी आपल्या विनोदशैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवले होते. त्यांच्या चित्रपटातील बरीच गाणी तुफान लोकप्रिय ठरली आहेत. त्यांच्या गाण्यांची क्रेझ आजही सिनेरसिकांमध्ये पाहायला मिळते. आता त्यांच्या ढगाला लागली कळ या सुपरहिट गाण्याचा रिमेक करण्यात आले आहे.


हे गाणे आयुष्मान खुराणाची मुख्य भूमिका असलेल्या ड्रीम गर्ल चित्रपटात पाहायला मिळणार आहे. नुकतीच या मराठमोळ्या गाण्याची एक झलक रिलीज करण्यात आली असून आयुष्मान आणि नुसरत भरुचासोबत यात रितेश देशमुखनेही ठेका धरलेले पाहायला मिळत आहे.

रितेश आणि आयुष्मानचा मराठी संवादही गाण्याच्या सुरुवातीला ऐकायला मिळतो. हे गाणे मराठी प्रेक्षकांसाठी नक्कीच खास असणार आहे. हे संपूर्ण गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान आयुष्मान हा ‘ड्रीमगर्ल’ चित्रपटात अनोख्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरलाही चाहत्यांची भरभरुन पसंती मिळाली. १३ डिसेंबर रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Leave a Comment