चोरी करण्यासाठी गेलेल्या चोरट्याचीच गाडी गेली चोरीला


आपल्याकडे ‘जशी करणी तशी भरणी’ ही म्हण प्रसिध्द आहे. या म्हणीचाच अनुभव  वॉशिंग्टन येथील एका व्यक्तीला आला आहे. हा व्यक्ती रस्त्याच्याकडेला असलेल्या एका दुकानात चोरी करण्यासाठी गेला होता, त्यावेळी कोणीतरी त्याचाच ट्रक चोरून नेला. केनेविक पोलिस डिपार्टमेंटने फेसबूकवर पोस्ट करत या घटनेची माहिती दिली.

पोलिस घटनास्थळी पोहचल्यावर गाडीचा मालक विलियम केलेने सांगितले की, तो चावी गाडीतच विसरला होता व कोणीतरी त्याची पिकअप गाडी चोरून नेली. पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज तपासल्यावर त्यांना या घटनेची दुसरी बाजू समजली.

Stolen Pick-up Truck

On 8-25-2019 at about 6:00AM, KPD responded to the area of the 500 block of E Bruneau for an auto theft that had just occurred. The owner of the vehicle, William Kelley, was reporting that someone just stole his red 1992 Chevy pickup with maroon canopy, WA license B96531X. He had left his keys on the seat. A male riding a 10-speed rode by and discovered the keys and then threw his back bike in the bed of the truck and fled. Video was obtained of the incident and a new fact was discovered. Kelley was at the location because he was stealing items from a business across the street. Kelley was booked into the jail in the AM hours on a warrant and subsequently a new charge of Burglary was added. Kelley's vehicle has still not been located. Any assistance with locating the truck or the identify the car thief, please call KPD reference case number 19-33651.

Posted by Kennewick Police Department on Sunday, August 25, 2019

सीसीटिव्हीमध्ये दिसते की, केले रस्त्याच्याकडेला गाडी लावून स्टोरमध्ये चोरी करण्यासाठी घुसला होता.

पोलिस डिपार्टमेंटने फेसबूकवर पोस्ट करत लिहिले की, आम्ही घटनेचा व्हिडीओ बघत होतो तेव्हा आम्हाला नवीनच माहिती मिळाली. केले त्याठिकाणी स्टोरमध्ये चोरी करण्यासाठी आला होता.

फुटेजमध्ये दिसते की, चोरट्याने बाइक ट्रकच्या मागे उभी केली आणि तो ट्रक घेऊन फरार झाला. आतापर्यंत केलेचा ट्रक सापडलेला नाही.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अनेकजण मजेदार कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, चोरांना एकमेकांबद्दल आदर नाहीये का ?

तर चोरीच्या आरोपा खाली केलेलाच बेंटन काउंटी जेलमध्ये बंद करण्यात आले आहे.

Leave a Comment