अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांनी करोडो रूपये केले दान


जगभरातील अनेक मोठमोठ्या व्यक्ती आपल्या कार्याबरोबरच दान करण्यात देखील सर्वात पुढे असतात. अ‍ॅपल कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी त्यांचे 23,700 शेअर दान केले आहेत. दान करण्यात आलेल्या शेअर्सची किंमत ही 50 लाख डॉलर (36 करोड रूपये) आहे.

कंपनीने सोमवारी रेग्युलेटरी फाइलिंगमध्ये ही माहिती दिली. मात्र अद्याप हे समजू शकलेले नाही की, टिम कुक यांनी एवढी मोठी रक्कम कोणाला दान केली. कुक नेहमीच अशाप्रकारे दान करत असतात.

टिम कुक यांनी मागील वर्षी ऑगस्टमध्ये देखील एवढ्याच किंमतीचे शेअर दान केले होते. अ‍ॅपलनुसार, टिम कुक यांच्याकडे आता 8 लाख 54 हजार 849 शेअर्स आहेत. या शेअर्सची किंमत 17.6 करोड डॉलर (1267 करोड रूपये) आहे.

2015 पासून कुक नेहमीच दान करत आले आहेत. ते दर 6 महिन्यांनी आपल्या शेअर्सचा काही भाग दान करतात. रॉबर्ट एफ केनेडी सेंटर फॉर जस्टिस आणि ह्यूमन राइट्स संस्था आणि ह्यूमन राइट्स सारख्या उपक्रमांसाठी ते दान करत असतात.

कुक यांच्याबरोबर कंपनीने देखील जाहीर केले आहे की, अ‍ॅमेझॉन जंगलाच्या संरक्षणासाठी कंपनी दान करणार आहे. स्वतः कुक यांनी ट्विट करत ही माहिती दिली.

Leave a Comment