थायलंडच्या राजघराण्याने पहिल्यांदाच शेअर केले शाही मिस्ट्रेस चे दुर्मिळ फोटो


थायलंडच्या राजघराण्याने पहिल्यांदाच राजाची मिस्ट्रेस सिनीनातचे फोटो शेअर केले आहेत. शाही पॅलेसने राजाच्या मिस्ट्रेसचे 60 फोटो आणि 40 पानांची बायोग्राफी देखील तयार केली आहे. यातील काही फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.

थायलंडचे राजा महा वाजिरालोंगकोर्नने आपल्या 67 व्या वाढदिवसादिवशी 34 वर्षीय सिनीनात वॉन्गवाजीरापकडीला राजघराण्याचे सदस्य बनवले होते. राजाची ही मिस्ट्रेस सैन्यात नर्स म्हणून कार्यरत होती. याआधी राजाने आपली बॉडीगार्ड सुथिदा तिदजईबरोबर लग्न केले होते. ती राजाची चौथी पत्नी होती.

चौथ्या राणीसमोरच राजाने सिनीनातला “Chao Khun Phra” हा शाही दर्जा दिला आहे. या शतकात पहिल्यांदा असे झाले आहे की, एखाद्या राजाने एखाद्या महिलेला ही शाही पदवी दिली आहे.

पहिल्यांदाच समोर आलेल्या सिनीनात वॉन्ग्वाजीरापकड़ी आणि राजा वाजिरालोंगकोर्न यांच्या फोटोमध्ये सिनीनात विमान उडवताना दिसत आहे. सैन्याच्या गणवेशात देखील ती राजाबरोबर दिसत आहे.

राजा आणि त्यांची मिस्ट्रेस सिनीनात यांचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. सिनीनात राजाच्या रॉयल बॉडीगार्ड युनिटचा भाग आहे. तिला मे मध्येच मेजर जनरल हा दर्जा देण्यात आला आहे. थायलंडच्या कायद्यानुसार, राजा अथवा राजाच्या निर्णयावर चुकीची टिप्पणी केल्यावर 15 वर्षांची शिक्षा होऊ शकते.

Leave a Comment