‘या’ दिवशी रिलीज होणार संजय दत्तच्या ‘प्रस्थानम’चा ट्रेलर


सध्या सिनेरसिकांमध्ये संजय दत्तच्या आगामी ‘प्रस्थानम’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. हा ‘प्रस्थानम’ नावाच्याच तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे. चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता. संजय दत्त यात सत्तेसाठी लढा करणाऱ्या राजकारण्याच्या भूमिकेत दिसला.


प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवणाऱ्या टीझरनंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास चित्रपटाचा ट्रेलर सज्ज झाला आहे. हा राजा लढाईशिवाय आपला वारसा सोडणार नाही. त्याच्या रक्षणासाठी तो काहीही करेल, अशी पोस्ट शेअर करत संजयने ट्रेलरच्या प्रदर्शनाची तारीख घोषित केली आहे.

हा ट्रेलर २९ ऑगस्टला रिलीज करण्यात येणार आहे. मनीषा कोईराला, चंकी पांडे, जॅकी श्रॉफ, सत्यजीत दुबे, अली फजल यांच्याही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन देवा कट्टा यांनी केले आहे तर हा चित्रपट २० सप्टेंबरला रिलीज होणार आहे.

Leave a Comment