तुम्ही देखील पाहिलाच पाहिजे श्रद्धाचा हा मराठमोळा व्हिडिओ


सध्या ‘साहो’ चित्रपटामुळे आशिकी गर्ल श्रद्धा कपूर चांगलीच चर्चेत आहे. श्रद्धा या चित्रपटाच्या माध्यमातून दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. सध्या सोशल मीडियात आपल्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असणाऱ्या श्रद्धाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

श्रद्धा या व्हिडिओमध्ये छायाचित्रकारांसोबत मराठीत संवाद साधताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ प्रत्येक मराठी प्रेक्षकाची मने जिंकणारा आहे. श्रद्धा शिवांगी कोल्हापुरे यांची मुलगी असल्यामुळे ती सुरुवातीपासून मराठी वातावरणात वाढली आहे. यासोबतच अनेक वर्ष आजी – आजोबांसोबत घालवल्यामुळे तिला मराठी भाषा चांगलीच अवगत आहे.


या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर येत्या ३० ऑगस्टला श्रद्धाचा साहो चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याचबरोबर ती स्ट्रीट डान्सर या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती अभिनेता वरुण धवनसोबत डान्सवर आधारित या चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

Leave a Comment